“साहसे श्रीः प्रतिवसति ।”
यवतमाळ हा विदर्भाच्या आंध्र प्रदेश सध्याचे तेलंगना राज्याच्या सिमेलगत असलेला फारसे उद्योग नसलेला परंतु नैसर्गिक साधन संपत्ती गोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला व उच्च प्रतीचा कापूस पिकविणारा जिल्हा म्हणून ज्ञात आहे. यवतमाळ शहरात सामान्य जनांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्या व त्यांना बचतीची सवय लागावी याकरीता त्यांना त्यांचे व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहून निःसंकोचपणे करता यावेत म्हणून 1965 साली तत्कालीन मा. जिल्हा संघचालक स्व. श्री. श्री. द. उपाख्य बाबाजी दाते यांच्या पुढाकाराने आपल्या बँकेची स्थापना करण्यात आली. बँकेचे सुरवातीचे नांव दि संकटमोचन अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ असे होते व पंजीयन क्र. वायएमएल / बीएनके / 114 असा आहे.
बँकेला कामकाज सुरू करण्याची परवानगी (रजिस्ट्रेशन) दि. 12 एप्रिल 1965 रोजी मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी दिली व बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात दि. 07 मे 1965 रोजी अवधुतवाडी यवतमाळ येथील कार्यालयाचे उद्घाटन श्री. बाबासाहेब घारफळकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या हस्ते होवून झाली.
बँकेची सुरवातीची सभासद संख्या 129 होती व भागभांडवल रु. 30100 /- एवढे होते. पहिल्या वर्षी दि. 30 जून 1966 रोजी संपणाऱ्या वर्ष अखेरीस बँकेच्या ठेवी रू. 85068 /- कर्ज रू.111584/- व नफा रू. 1140.33 एवढा होता.
बँकेचे प्रथम व्यवस्थापक म्हणून स्व. श्री. के. उ. पांडे काम पाहत होते. बँकेच्या सुरवातीचे संचालक मंडळ
1) श्री. श्रीकृष्ण द. दाते अध्यक्ष
2) श्री. विश्वनाथ द. पेंडसे उपाध्यक्ष
3) श्री. गोपाल रा. तेलंग सचालक
4) श्री. राजाभाऊ शे. देशपांडे संचालक
5) श्री. काशीनाथ ज. संगेवार संचालक
6) श्री. पांडूरंग म. जोगळेकर संचालक
7) श्री. नारायण सि. गदे संचालक
8) श्री. भास्कर वि. कुंटे संचालक
9) श्री. वसंत ल. फडणीस संचालक
सुरवातीच्या काळात वरील संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बँक यवतमाळात सामान्य जनांची बँक म्हणून ओळखली जाऊ लागली.
सन 1969-70 साली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी बँकेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला व सहकार विभागाच्या परवानगीनंतर बँक दि. 05/08/1971 पासून संकटमोचन अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ ऐवजी दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि. म्हणून ओळखली जाऊ लागली.
सन 1972 पर्यंत बँकेची एकच शाखा यवतमाळ शहरात कार्यरत होती. बँकेने अनेक होतकरू उद्योजकांना कर्ज रूपाने मदतीचा हात दिला होता व सामान्यांना बचतीची दिशा दिली. सन 1972 मध्ये बँकेचा पहिला शाखा विस्तार करण्यात आला दि. 09 एप्रिल 1972 रोजी आंध्र प्रदेशाच्या सिमेवरील आदिवासी क्षेत्रातील गांव पाटणबोरी येथे बँकेची दुसरी शाखा उघडण्यात आली. या शाखेने सुध्दा पाटणबोरी सारख्या साधन सोयी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी उत्कृष्ट कार्य केले व करीत आहे. अनेक तरुणांना उद्योगाकरीता तसेच शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीपूरक व्यवसायाकरीता मदतीचा हात देवून स्वतःच्या पायावर उभे करण्याकरिता मदत केली.
Particulars
|
Mar-2018
|
Mar-2019
|
Mar-2020
|
Mar-2021 (Un-Audited)
|
---|---|---|---|---|
Share Capital
|
7059.28
|
7321.90
|
7560.19
|
7946.89
|
Reserves
|
16243.45
|
16863.61
|
17225.23
|
17996.85
|
Total Owned Funds
|
30344.69
|
33655.81
|
37302.71
|
42568.63
|
Deposits
|
217737.62
|
236340.13
|
249538.99
|
266069.74
|
Loans and Advances
|
150136.84
|
159944.29
|
158862.59
|
172890.82
|
Profits (Before Tax)
|
2095.73
|
2788.09
|
2117.32
|
1467.86
|
Profits (After Tax)
|
1045.73
|
1388.09
|
617.32
|
267.86
|
Working Capital
|
250570.72
|
272674.03
|
290045.78
|
313871.03
|
NPA (Net)
|
20217.98
|
12221.24
|
25068.14
|
21263.84
|
CRAR
|
13.28%
|
13.32%
|
13.51%
|
13.01%
|
The Bank offers you to become the shareholder by purchasing minimum 60 shares @ 25/- each. Hence, you can become a shareholder by depositing Rs.1500/- (+) entrance fee of Rs5/-. The Shareholders get dividend every year on the amount of shares.
The bank was paid dividend @ 9% on the share capital for F.Y. 2014-15. The bank tries to pay dividend at best possible way. The rate of dividend is decided every year in the Annual General Meeting for the bank.
The Shareholders can also vote in the Annual General Meeting and in the election of the Board of Directors as per Act & Byelaws.
Yavatmal Urban Co-op. Bank always try to offer innovative customer service and schemes. In order to do so we have started Core Banking facility . Latest technology used to provide quality service to the customer`s satisfaction.
Every year Yavatmal Urban Co-op. Bank in association with Keshav Smurti Vachanalay organizes Dr. C. D. Date lecture series.
Yavatmal Urban Co-op. Bank provides aid to the social work of institutions Vanvasi Kalyan Ashram, Dr. Hegdewar Sewa Samiti, Savitribai Seva Samiti, A.B. Vidyarthi Parishad, Shiv Jayanti Utsav, Shri Ram Janmotsav Shobha yatra, Swadesh Jagaran Manch.
Yavatmal Urban Co-op. Bank provides medical aid to their shareholders and employee for critical illness like Cancer, Heart attack, Kidney failure, etc. In case of sad demise of any employee, all employees voluntarily give their one day salary to their colleague as a token of solidarity for the deceased family.
In the pandemic Covid-19 crisis time activites under taken by Yavatmal Urban Cooperative Bank.
©Copyright 2021, The Yavatmal Urban Co-Operative Bank Ltd., Yavatmal. All rights reserved.
Developed by apco Solutions